सुरक्षा
आम्ही WordPress प्रकल्प आणि इकोसिस्टमची सुरक्षा गांभीर्याने घेतो. 20 वर्षांहून अधिक इतिहासासह आणि 43% पेक्षा जास्त वेबला सामर्थ्य देत, आम्ही एकल ब्लॉगरपासून ते एंटरप्राइझ संस्थांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
वर्डप्रेस कोर, प्लगइनस्, थिमस् किंवा याहूनही मोठ्या वर्डप्रेस इकोसिस्टिम मधील असुरक्षितता जाबदारपणे प्रकट करण्याला प्रोत्साहन देतो.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला WordPress मध्ये असुरक्षितता आढळली आहे, तर कृपया ती गोपनीय ठेवा आणि WordPress सुरक्षा टीमला अहवाल द्या.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला WordPress.org वर उपलब्ध WordPress प्लगइन किंवा थीममध्ये असुरक्षितता आढळली आहे, तर कृपया ती गोपनीय ठेवा.
- प्लगइनच्या असुरक्षिततेसाठी, प्लगइन विकासक आणि प्लगइन टीमला अहवाल द्या.
- थीमच्या असुरक्षिततेसाठी, थीम विकासक आणि थीम पुनरावलोकन टीमला अहवाल द्या.
आमची प्रक्रिया
WordPress प्रकल्प वेबच्या 43% पेक्षा अधिक भागासाठी स्थिर, सुरक्षित, विश्वासार्ह प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. कोर WordPress सॉफ्टवेअर विकास जीवनचक्र प्रक्रियेदरम्यान कोड पुनरावलोकन समाविष्ट करते, विश्वासार्ह कमिटर्सद्वारे ओपन-सोर्स योगदान पुनरावलोकित केले जाते.
WordPress सुरक्षा टीम WordPress कोर सॉफ्टवेअरमध्ये सुरक्षा समस्या ओळखण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी, OWASP टॉप टेन सारख्या धोक्यांपासून सॉफ्टवेअर कडक करण्यासाठी आणि इकोसिस्टममध्ये मार्गदर्शन देण्यासाठी कार्य करते.
WordPress च्या प्रत्येक घटकाचे मुख्य विकासक, सुरक्षा संशोधक आणि प्रमुख योगदानकर्त्यांसह 50+ विश्वासार्ह तज्ञांव्यतिरिक्त, सुरक्षा टीमचे प्रायोजित सदस्य सॉफ्टवेअर आणि इकोसिस्टममधील चिंता ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी वेळ समर्पित करतात.
जबाबदारीने उघड केलेल्या सुरक्षा असुरक्षिततेला हाताळण्यासाठी, सुरक्षा टीम निराकरणे विकसित करण्यासाठी, मजबूत चाचणी प्रकरणे तयार करण्यासाठी आणि त्या निराकरणांना बगफिक्स रिलीजमध्ये प्रकाशित करण्यासाठी कार्य करते. WordPress च्या फक्त नवीनतम आवृत्तीचे अधिकृतपणे समर्थन केले असले तरी, सुरक्षा टीम जुन्या आवृत्त्यांसाठी फिक्सेस बॅकपोर्ट्स करण्याचे शिष्टाचार म्हणून करते, जेणेकरून जुन्या साइट्सना ऑटो-अपडेटद्वारे महत्त्वपूर्ण सुरक्षा फिक्सेस मिळतील.
सुरक्षा टीम महत्त्वाच्या वेब होस्टिंग ऑपरेटर्स आणि सुरक्षा इकोसिस्टम प्रदात्यांशी थेट काम करते, WordPress-आधारित साइटवरील धोक्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी, रिलीज रोलआउटचे समन्वय आणि वेब ॲप्लिकेशन फायरवॉल (WAF) समाधान विकसित करण्यासह.
WordPress प्रकल्पाच्या सुरक्षेबद्दल अधिक माहिती आमच्या श्वेतपत्रात वाचा.
प्लगइन विकासक
सामान्य API मार्गदर्शकातील सुरक्षा मार्गदर्शक सुरक्षित विकास तत्त्वांसाठी तुमचा मार्गदर्शक आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्लगइनमध्ये सुरक्षा समस्येची ओळख केली आहे, तर WordPress प्लगइन्स टीम तुम्हाला समर्थन देण्यासाठी येथे आहे.
तुमच्या प्लगइनमधील सुरक्षा समस्यांचा सामना कसा करावा याबद्दल अधिक माहिती मिळवा.
थिम विकासक
सामान्य API मार्गदर्शकातील सुरक्षा मार्गदर्शक सुरक्षित विकास तत्त्वांसाठी तुमचा मार्गदर्शक आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या थीममध्ये सुरक्षा समस्येची ओळख झाली आहे, तर WordPress थीम पुनरावलोकन संघ तुम्हाला समर्थन देण्यासाठी येथे आहे.
थिम मधील सुरक्षा समस्यांच्या निराकारणाबद्दल अधिक माहिती मिळावा
वेब होस्ट
ऍडव्हान्स ऍडमिनिस्ट्रेशन हँडबुकमधील सुरक्षा मार्गदर्शकामध्ये तुमची होस्टिंग एंवीरोन्मेन्ट सुरक्षित करण्यासाठीची महत्वाची माहिती दिलेली आहे.
आम्ही शिफारस करतो कि स्वतःचे जबाबदार प्रकटीकरण धोरण प्रकाशित करा .